Site icon Bhagyashri Travels

जगातील सर्वात मोठे मंदिर भारतात नाही?

जगातील सर्वात मोठे मंदिर - अंगकोर वाट

अतिप्राचीन व वैभवशाली हिंदू धर्माच्या अनेक पाऊलखुणा असून इतिहास व संस्कृतीचा गौरवास्पद वारसा त्या सांगतात. त्यातील एक म्हणजे दिमाखदार मंदिरे.

पण हिंदू धर्माचे सर्वात भव्य मंदिर भारतात नव्हे, तर कंबोडिया आहे. ते म्हणजे 'अंगकोर वाट'.

‘अंगकोर वाट’ या शब्दाचा अर्थ आहे मंदिरांची नगरी. हे जगातील सर्वात मोठे धार्मिक स्थळही आहे.

ख्मेर साम्राज्य, १२ वे शतक

जगातील सर्वात मोठे मंदिर

प्राचीन काळी कंबोडिया हे भारत व चीन या दोन्ही देशांसाठी व्यापाराचं समृद्ध केंद ोतं.

अंगकोर  म्हणजेच पूर्वीचं यशोधरपुरा. इस ८८९ मध्ये ख्मेर राजा यशोवर्धन (पहिला) याने यशोधरपुरा ही  आपली राजधानी वसवली. कालांतराने तिलाच अंगकोर म्हणून ओळखले जाऊ लागले.

ख्मेर साम्राज्य हे जगातील प्राचीन साम्राज्यांपैकी एक महत्वाचे साम्राज्य! ११ ते १३ व्या शतकांमध्ये हे साम्राज्य भरभराटीस आले.

त्या काळातील नैऋत्य-आशिया मधील हे सर्वात मोठे साम्राज्य म्हणून ओळखले जाते.

अंगकोर वाटची निर्मिती

अंगकोर वाट चे बांधकाम

अंगकोर वाटची निर्मिती बाराव्या शतकात सूर्यवर्मन (दुसरा) या राजाने केली. येथे ख्मेर साम्राज्यासाठी विष्णू देवतेचे हे भव्य मंदिर साकारण्यात आले. सुमारे ४० वर्षे मंदिराचे बांधकाम  सुरू होते. सूर्यवर्मनच्या मृत्यू नन्तर युध्दे, आक्रमणे व इतर घडामोडी यांमुळे मन्दिराच्या निर्मितीत खंड पडला. त्यांनतर जयवर्मन सातवा (११८१-१२१९) यांच्या काळात अंगकोर वाटची  निर्मिती पुन्हा सुरू करण्यात आली. विष्णू व शिव या  दोन्ही देवतांची उपासना या मंदिरात होते. सूर्यवर्मन राजाची (१११३-११४५) समाधीही  इथेच असल्याचा विश्वास आहे.

अंगकोर वाट मंदिरातील आकर्षणे

ख्मेर वास्तुकलेचा अद्भुत आविष्कार म्हणजे अंगकोर वाट मंदिर. मंदिरात सौंदर्यपूर्ण स्थळांची रेलचेल आहे. त्यापैकी खास आकर्षक गोष्टी  डोळ्यांचे पारणे फिटते त्या खालीलप्रमाणे

  • महाभारत व रामायण कालीन युद्धकथांवर आधारीत शिल्पे
  • समुद्रमंथन कथेचे शिल्प
  • मंदिराच्या टोकाशी असलेले चार मनोरे
  • मोठ्या मनोऱ्याच्या टोकावरील बुद्धाचे शिल्प
  • म्युझियम मध्ये ेवलेली विष्णूची मूर्ती
  • गंगावतरण म्हणजेच गंगा नदीच्या पृथ्वी वरील आगमनाची कथाही अनेक मंदिरात आढळते
  • भव्य लायब्ररी,प्रतिध्वनी ऐकू येणारा हॉल ऑफ इको, भव्य सज्जे ही या वास्तूचे सौंदर्य अधिकच खुलवतात

अंगकोर वाट मधील प्रमुख मंदिरे

अंगकोर वाट हा मंदिरांचा समूह असून त्यात अप्रतिम मंदिरांचा खजिनाच पर्यटकांसमोर खुला होतो. असंख्य देवदेवतांच्या शिलपांनी मंदिराच्या भिंती नटलेल्या आहेत. त्यातील काही प्रमुख मंदिरे म्हणजे

  • बंते सामराई
  • प्रिआ रूप
  • बंते स्त्रेई
  • प्रिआ खान
  • ता प्रोहम
  • प्रिआह निक पिन

अंगकोर वाट मधील मंदिरे


अंगकोर वाट ची संकल्पना

संपूर्ण विश्व हे एका सूक्ष्म कणात सामावलेले आहे, ही हिंदू तत्वज्ञानाची जी मूळ संकल्पना आहे, तीच या मंदिराची मूळ संकल्पना आहे. मंदिराभोवती खंदक असून, चार मनोऱ्यांपैकी प्रमुख मनोरा म्हणजे विश्वाचं केंद्रस्थान असलेल्या मेरू पर्वताचं प्रतीक आहे. प्रिआह निक पिन मंदिरातील तलाव हे हिमालय पर्वताचं प्रतीक असून सभोवतालचे चार तलाव हिमालयात उगमस्थान असलेल्या चार नद्या मानल्या जातात. मध्ययुगीन काळात अंगकोर वाट हे व्रह  विष्णुलोक  म्हणजेच गृह  विष्णुलोक म्हणून ओळखले जाई.

अंगकोर वाट मंदिराची खास वैशिष्टये

  • मंदिराभोवतीच्या खंदकाची रुंदी सुमारे ७०० फूट असून ते जणू तलावाप्रमाणेच दिसतात. हे खंदक मेरू पर्वताभोवतीच्या क्षीरसागराचे प्रतीक मानले जातात.
  • या मंदिरावर बौद्ध वास्तुकलेचा देखील प्रभाव असून बुद्धाच्या मूर्ती असल्याने बौद्ध धर्मियही येथे भक्तीभावाने येतात.
  • अंगकोर वाट मधील नयनरम्य सूर्योदय व सूर्यास्त अनुभवणे हा एक अविस्मरणीय अनुभव आहे. यासाठी जगभरातील पर्यटक येथे येतात.
  • ५ दशलक्ष टन सॅन्डस्टोन पासून हे भव्य मंदिर उभारण्यात आले आहे.
  • कम्बोडिया देशाच्या राष्ट्रीय ध्वजावर अंगकोर वाट मंदिराला माने स्थान आहे.
  • मंदिराच्या बाहेरी भिंत ३.६ किमी लांब आहे.
  • मंदिराची वाट पश्चिम दिशेकडून आहे.

अंगकोर वाट पहाट


अंगकोर वाट ला भेट देण्याचा उत्तम सीझन कोणता
?

अत्यंत उत्तम रीतीने जतन केलेले हे अप्रतिम मंदिर पाहणे हे अस्सल पर्यटकांचे स्वप्न असते. जगभरातून लाखो पर्यटक या वर्ल्ड हेरिटेज साईटला भेट देतात व याचे शालीन सौंदर्य व कलात्मक दिमाख अनुभवून तृप्त होतात. नोव्हेम्बर ते  मार्च हा अंगकोर वाट ला भेट देण्याचा उत्तम सीझन आहे. या वेळेला हवा थंड व  प्रसन्न असते.

कम्बोडियातील अंगकोर वाट हे अद्वितीय मंदिर आयुष्यात एकदा पाहायलाच हवे असे आहे. भाग्यश्री ट्रॅव्हल्स तर्फे अंगकोर वाट ची टूर आयोजित  केली जाते व तिला नेहमीच उत्तम प्रतिसाद मिळतो.  तेव्हा चला, हा अविस्मरणीय व गौरवशाली वारसा अनुभवायला!

Exit mobile version